Pages

मुलींची बाजी फक्त कागदावरच ?

मुलींची बाजी फक्त कागदावरच ? 

आता जून महिना संपायला आलाय - दरवर्षीप्रमाणे एस्एस्सी,एचएससी, सीबीएसई, आयसीएसई अशा वेगवेगळ्या बोर्डांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झालेत. दरवर्षी दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाल्यावर बहुतेक सर्व वर्तमानपत्रात एक हेडलाईन नियमितपणे प्रसिद्ध होते – “या वर्षीही निकालात मुलींनीच बाजी मारली!” या वर्षीदेखील अशीच बातमी आपण अनेक ठिकाणी वाचली.

हा रस्ता कोणाचा

हा रस्ता कोणाचा 


तुम्हाला तुमच्या शहरातल्या रस्त्यांची नावं माहिती आहेत? मग सांगा बघू त्यातले किती रस्ते महिलांच्या नावाने आहेत? नाही ना माहित? कारण आपण कधी या दृष्टीने आपल्या शहराचा विचारच केलेला नसतो. मॅपबॉक्स ह्या नकाशे बनवणार्या कंपनीतर्फे जगातल्या सात शहरांमध्ये असा एक पद्धतशीर सर्व्हेच घेतला होता. लंडन, पॅरीस, सानफ्रान्सिस्को, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि बंगळूरू ह्या शहरांमधल्या रस्त्यांना जी नावं आहेत, त्यापैकी किती रस्त्यांना महिलांची नावे आहेत हेच ह्या मोजणीच्या माध्यमातून शोधायचे होते.

परिघाबाहेरची अभिव्यक्ती

गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने एक अतिशय महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. त्यामुळे आता समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारे कलम 377 आता रद्द झाले आहे आणि आपल्या देशातल्या लैंगिक अल्पसंख्यांक मंडळींना दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून लैंगिकतेच्या अभिव्यक्तीच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला कोर्टाच्या पायरीवर यश आलं आणि अर्थातच ह्या बातमीमुळे देशभरातल्या एलजीबीटी समुदायाने आनंदाचा जल्लोष केला. सहा सप्टेंबरला सकाळीच कोर्टाचा निकाल आला आणि त्यानंतर ही महत्त्वाची बातमी दिवसभर सगळ्या वृत्तवाहिन्यांवर वेगवेगळ्या रूपात झळकत होती ! त्या निमित्ताने एलजीबीटी समुदायातले लोक घरोघरच्या टीव्हीच्या पडद्यांवर आपल्या भावना व्यक्त करताना दिसले! एरव्ही स्त्रिया किंवा पुरुष या दोन ठळक प्रकरांच्यापेक्षा निराळी लैंगिकता असलेल्या व्यक्ती आपल्याला टीव्हीवर सहसा दिसत नाहीत. कारण निराळी लैंगिक अभिव्यक्ती असलेल्या लोकांना प्रसारमाध्यमात अगदी क्वचितच जागा मिळते ! पण ज्या दिवशी निकाल जाहीर झाला त्या दिवशी मात्र सगळ्याच वृत्तवाहिन्यांनी ह्या निकालाविषयी अनेक समलैंगिक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या; त्यासोबत कट्टर धार्मिकता जपणार्‍यांच्या बरोबर वादविवाद देखील घडवून आणले. पण कदाचित सुप्रीम कोर्टाच्या ह्या ताज्या निर्णयाच नावीन्य संपलं की पुन्हा समलैंगिकतेविषयी काहीतरी वाद उद्भवेपर्यन्त ही मंडळी अदृष्यच राहतील!
                      बिंब - प्रतिबिंब
समाजावर प्रसारमाध्यमांचा परिणाम होतो की माध्यमात फक्त समाजातल्या व्यवहाराचं प्रतिबिंब दिसतं – हा जवळजवळ ‘कोंबडी आधी की अंडं आधी’ सारखा न उलगडणारा प्रश्न झालेला आहे! जेव्हा समाजात एखादी वाईट घटना घडते तेव्हा हमखास त्याचं खापर प्रसारमाध्यमांवर फोडलं जातं आणि प्रसारमाध्यमांनी कसं जबाबदारीने वागायला पाहिजे त्याबद्दल कानपिचक्या दिल्या जातात ... त्याचवेळी माध्यमांची निर्मिती करणारी माणसं मात्र – आम्ही जे समाजात घडतं तेच तर दाखवतो – असा बचावात्मक पवित्रा घेतात. पण जेव्हा माध्यमातून काही खास निराळं आणि सकारात्मक चित्रण करायचा प्रयत्न केला जातो – तेव्हा मात्र त्यांच्या प्रयत्नांची विशेष दखल घेतली जात नाही. मला वाटतं, की जेव्हा प्रसारमाध्यमं असा काही विशेष प्रयत्न करतील तेव्हा आपण त्याची आवर्जून दखल घ्यायला पाहिजे. नुकत्याच पार पडलेल्या दिवाळीच्या दरम्यान मला जाहिरातीच्या माध्यमातून होणारे दोन वेगळे प्रयत्न मला दिसले - त्यांचीच ओळख मला करून द्यावीशी वाटते आहे.